राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणी अभियानास मंगरूळ व जानवे येथे प्रारंभ
शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीत सामील व्हा
अमळनेर (प्रतिनिधी) या देशाला व राज्याला शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाचीच खरी गरज असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी तरुण व युवा पिढीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील व्हावे, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी मंगरूळ व शिरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाप्रसंगी काढले.
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ.अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मंगरूळ व जानवे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, महिला प्रदेश चिटणीस रिता बाविस्कर, शिवाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, शेतकी संघ प्रशासक संजय पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, योजना पाटील, मंदाकिनी पाटील, नगरसेवक विवेक पाटील आदी उपस्थित होते.
जानवे येथे जोरदार प्रतिसाद
जानवे गावात देखील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या सदस्य नोंदणीस तरुणाई ने जोरदार प्रतिसाद देत उस्फूर्तपणे नोंदणी करून घेतली. यावेळी रावसाहेब पाटील, कृष्णा पाटील, हर्षल भटू पाटील, सुभाष पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र पाटील, नाटु पाटील, विनायक पाटील, मधू पाटील, न्हानभाऊ पाटील, राजेंद्र न्हावी, अशोक भिल, साहेबराव पारधी, प्रकाश वाल्हे, प्रफुल्ल पाटील, कमलेश पाटील, मोठाभाऊ पाटील व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
मंगरूळ येथेही तरुणाई आघाडीवर
मंगरूळ येथेही तरुणाईने प्रतिसाद देत सदस्य नोंदणीसाठी आघाडी घेतली. यावेळी सरपंचाच्या वतीने संदीप पाटील, ग्रा प सदस्य, अनिल पाटील, विश्वास पाटील, अमोल पाटील, दीपक बागुल, अशोक पाटील, भीमराव पा, आधार पा, देविदास प, साईनाथ पा, राहुल पा, निंबा पा, गोपाळ बागूल, संतोष पा, कल्याण पा, सुभाष पा, जिजाबराव पा, भिकान पा, गिरीश पा, विनोद पा, आनंदराव पा, पांडू पा, बाळू पा, शालीक पाटील, धनराज पा, राजेंद्र पा, आनंदा पा, नारायण पा,धनंजय पा, वाल्मिक पा ,दीपक पाटील, सुभाष पाटील, मोतीलाल पाटील व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.