६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी धुळ्यात “एक वही एक पेन” अभियान राबवून अनोखे अभिवादन !
धुळे (प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर २०२१ रोजीच्या या महापरिनिर्वाणदिनी त्यांना आदरांजली वाहताना हारफूले, मेणबत्ती, अगरबत्ती न आणता “एक वही आणि एक पेन” तसेच शैक्षणिक साहित्य वाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षा च्यावतीने करण्यात येत आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी धुळे शहरातील बस स्टँड जवळ असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी हजारो नागरिक येत असतात. यावेळी ते आपल्यासोबत हारफूले, मेणबत्ती, अगरबत्ती, वाहून महामानवाला आदरांजली वाहतात. या वस्तूंचा नंतर काहीच वापर किंवा उपयोग होत नाही. हे सर्व साहित्य वाया जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “शिक्षणाची” शिकवण दिल्याप्रमाणे एक वही-पेन जर त्यांच्या चरणी वाहिले तर हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल.
असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष धुळे जिल्हा अध्यक्ष विशाल पगारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण इशी शहर अध्यक्ष नागिंद मोरे, उपजिल्हा अध्यक्ष भैया खरात, विनोद केदार, सुगत मोरे, अजय पगारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे ६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता सर्व अनुयायांनी या अभियानाला “एक वही व एक पेन” घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे.



