नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी मान्यवरांचा सूर
नंदुरबार (प्रतिनिधी) योग निसर्गोपचाराद्वारे संपूर्ण शरीराची निरोगी अवस्था प्राप्त होऊन उत्साह, आनंद चैतन्याची अनुभूती मिळते. नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.
शहरातील धुळे नवापुर रस्त्यावरील कल्याणेश्वर मंदिरासमोरील आनंद पार्क येथे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आनंद योग नॅचरोपॅथी हेल्थ सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी दिपप्रज्वलन प्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, आयुर्वेदाचार्य डॉ. बी. आर. पटेल, दंत चिकित्सक डॉ. किंजल बागले, फिजिओथेरपिस्ट डॉ. आयुषी क्षत्रिय, अँड. निलेश देसाई, निता देसाई, डॉ. त्रंबक पटेल, जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, आकाश वाणी, संतोष वसईकर, इंदुमती वसईकर उपस्थित होते. आनंद योग नॅचरोपॅथी सेंटरचे संचालक शेखर वसेकर यांनी कायरो प्रॅक्टिकथेरपी आयुर्वेदा केरली , शिरोधारा ,आयुर्वेद बस्तीबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन योगेश गवते यांनी केले.