चोपडा

प्रा. डॉ. अविनाश ढाकेंचे ऑनलाइन टेस्ट सिरीज लेक्चर निवडक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार

चोपडा (प्रतिनिधी) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जी पॅट सेल अंतर्गत जी पॅट २०२२ या पदव्युत्तर एम फार्म प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेसाठी अनुभवी मार्गदर्शक प्रा. डॉ. अविनाश ढाके (प्राचार्य, एस. एम. बी. टी. कॉलेज ऑफ फार्मसी धामणगाव, जिल्हा नाशिक) यांचे ऑनलाइन लेक्चर सिरीज दिनांक १९, २० आणि २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते व त्याचाच एक भाग सोमवार दि. २४ जानेवारी पासून टेस्ट सिरीज निवडक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे पदव्युत्तर एम फार्म फार्मास्युटिक्स आणि एम फार्म फार्माकोग्नोसी विषयातील अभ्यासक्रम पायाभूत संशोधन सुविधांसह तसेच तज्ञ मार्गदर्शनासह उपलब्ध आहेत. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व उपाध्यक्ष आशाताई पाटिल आणि सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या प्रोत्साहन पूर्वक मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य प्रा डॉ गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार जी पेट सेल २०२२ ने १ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०२१ कालावधीत प्रा. अतुल साबे यांनी फिजिकल फार्मास्युटिक्स,प्रा. रोहित पाटील यांनी मायक्रोबायोलॉजी तसेच प्रा. जे टी निंबाळकर यांनी मेडिसिनल केमिस्ट्री या विषयांवर बहुपर्यायी प्रश्न संच यांची सराव परीक्षा घेतली.

महाविद्यालयाने नोव्हेंबर २०२१ मध्ये डॉ गौरव हरला. डॉ मोहम्मद सिद्दीकी. व डॉ वंदना पाटील आणि डॉ प्रदीप बोलाने या नामांकित कॉलेजच्या तज्ञ प्राध्यापकांचे जी पॅट २०२२ वर गेस्ट लेक्चर घेतलेले आहेत. सदर कार्यक्रमासाठी जी पॅट सेल प्रमुख प्राध्यापक डॉ. ए.व्ही. पाटील तसेच सेल मेंबरने मेहनत घेतली. जी पॅट सेल २०२२ ने वेळोवेळी आयोजित या ऑनलाइन लेक्चर सिरीजचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे