किन्नर संघटनेच्या प्रमुख पार्वती जोगी यांची धुळे मंगलकार्यालय व लॉन्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
धुळे (प्रतिनिधी) निसर्गाने ज्याच्याकडून स्त्री पुरुषांचा अधिकार हिरावून घेतलेल्या व समाजाकडून दुर्लक्ष झालेल्या किन्नर बांधवांना समाजाकडून मिळणारी आर्थिक मदत हे एकमेव साधन आहे. मात्र ती मदत मिळतांना ती जबरदस्तीने न मिळवता स्वेच्छेने दिलेली मदत स्विकारली गेल्यास सौदाहाचे वातावरण निर्माण होऊन किन्नर बांधवाच्या भविष्यातील विकासासाठी ती उपयुक्त ठरेल असा आशावाद धुळे मंगलकार्यालय व लॉन्स असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
काही किन्नर बांधव धुळे शहरातील मंगल कार्यालयात सुरु असलेल्या मंगल सोहळा प्रसंगी प्रवेश करुन वधु-वर पित्यांकडून मोठ्या रक्कमांची मागणी करतात. ती न दिल्यास गोंधळ घालतात. अशा तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छापूर्ती कानुबाई मंदीर परिसरात असलेल्या प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात किन्नर संघटनेच्या प्रमुख पार्वती परशुराम जोगी यांची भेट घेऊन वरील भावना व्यक्त केल्या.
किनर बांधवांना प्रतिष्ठने व सन्मानाने जगता यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दाखल जनहित याचिकेवर आदेश देतांना सर्वोच्च न्यायालयाने किन्नर तथा तृतीयपंथी यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करून त्यांना शिक्षणात व नोकरी आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. समाजाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सहकार्य केले तर सामाजिक अभिसरणास प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. मात्र काही मोजक्या किन्नर बांधवांच्या जबरदस्तीने पेसा वसूल करण्याच्या या घटनांनी जनतेत वेगळा संदेश जाऊन त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
प्रत्येकास हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी सामाजिक रूढी, परंपरेनुसार नामकरण व शुभकार्याप्रसंगी किन्नर बांधवांचे आशिर्वाद घेणे शुभ तर त्यांचा शाप नुकसानकारक असल्याची जी भावना आहे त्याचा काही किन्नर बांधव गैरफायदा घेतात त्यामुळे या विषयात कटुता निर्माण न होता किन्नर संघटनेचे प्रमुख पार्वती परशुराम जोगी यांना समक्ष भेटून सहकार्य करण्याची विनंती यावेळी करण्यात आली व त्यांनीही हा विषय गांर्भीयाने घेण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन देत असतांना धुळे मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनचे पदाधिकारी संजय गुलाबराव बोरसे, गोविंद जोशी, विशाल अग्रवाल, योगेश मोराणकर, हेरंभ दाते. कल्पेश अग्रवाल, अनुप बडगुजर, अभिजीत पाडवी, किशोर संचेती, योगेश खंडेलवाल, सुरेश पाटील, प्रतिक गांगुर्डे, अश्विन दाते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.