बेकायदाशीर मांजा विक्री प्रकरणी दुकानदार विरोधात गुन्हा दाखल
चोपडा (विश्वास वाडे) मकर संक्रांती सणाच्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील मेन रोड वरील अरिहंत जनरल स्टोअर्समध्ये बेकायदाशीर मांज्याची विक्री केल्याप्रकरणी दुकानदार विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १४ जानेवारी मकर संक्रांती सणाच्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील मेन रोड वरील अरिहंत जनरल स्टोअर्स मध्ये दुकान मालक राहुल सुभाष जैन (वय – ४६ धंदा व्यापार, रा.राणी लक्ष्मीबाई चौक चोपडा) हा स्वतःचे फायद्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी विक्रीकरिता बंदी घातलेला तसेच इतरांचे जीवितास व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारा २८२० रुपये किमतीचे ४८ नायलॉन मांजा दोरा त्यात १७०० रुपये किमतीचा प्रति ५० रुपये दराचा एकूण ३४ मांजा दोरा बंडल (चक्री), वेगवेगळ्या रंगांमध्ये ३०० मीटर लांबीचा तसेच ११२० रुपये किमतीचा ८० रुपये दराचा एकूण १४ मांजा दोरा बंडल (चक्री ),वेगवेगळ्या रंगांमध्ये ५०० मीटर लांबीचा, एकूण २८२० रुपये किमतीचा ४८ मांजा दोरा बंडल (चक्री) त्याचे मालकीच्या दुकानात बाळगून विक्री करीत असताना मिळून आला म्हणून पो. कॉ.दीपककुमार शिंदे ( स्थानिक गुन्हे शाखा जळगाव ) यांचे फिर्यादीनुसार राहुल सुभाष जैन (वय ४६) धंदा व्यापार, रा. राणी लक्ष्मीबाई चौक चोपडा यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये भाग ५ सीसीटीएनएस १६/२०२२ भादवि कलम १८८, ३३६ सह पर्यावरण अधिनियम १९८६ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या पुढील व अधिक तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. सुभाष सपकाळ हे करीत आहेत.