मुक्ताळ गावाला तलाठी न लाभल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करेल ; रामेश्वर लोहार यांचा इशारा
भुसावळ (प्रमोद बावस्कर) गेली दोन वर्षे मुक्ताळ या गावी तलाठी सजा कार्यालय असून सुद्धा कायमस्वरुपी तलाठी या गावाला दोन वर्षापासून लाभलेला नाही. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत या निवेदनाची दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असून या परिसरातील शाळेतील मुले शेतकरी अबला महिला विद्यार्थिनी यांना शासकीय काम करण्यासाठी कधी उत्पन्नाचा दाखला, कधी रहिवासी दाखला तर कधी उतारा तर प्रकारच्या नोंदीसाठी मुक्ताळ गावला तलाठी सजा असून सुद्धा या गावांमध्ये तलाठी आलेला नाही.
तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन सर्व माहिती सांगून सुद्धा तीन तहसीलदार बदलून गेले तरी सुद्धा आतापर्यंत मुक्तळ गावाला कायमस्वरूपी तलाठी लाभलेला नाही. गोरगरिबांचे काम सोडून मजुरी पाडून बोदवळ, साळशिंगी, सुरवाडा, असेलवाढ, अशा गावांना फिरावे लागते. कधी तिथेसुद्धा तलाठी भेटतोच याची गॅरंटी नाही. तरी येणाऱ्या एक महिन्याच्या आत जर मुक्ताळ गावाला कायमस्वरुपी तलाठी न लाभल्यास तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अन्यथा सेवा हमी कायदा नुसार कारवाई होईल याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी व कायमस्वरूपी मुक्ताळ गावाला तलाठी मिळावा. ही नम्र विनंती अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे जळगाव जिल्हाअध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी दिला आहे.