चार हजाराची लाच घेताना वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकासह सरपंच पतीला एसीबीने केली अटक !
पाचोरा (प्रतिनिधी) रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवकाला धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच घेणाऱ्या वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकासह सरपंच पतीला एसीबीने रंगेहात अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले. त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२) यांनी स्वतःसाठी व वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांचेसाठी प्रथम पंचासमक्ष 6,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000 रुपये लाचेची मागणी केली. व सदर लाचेची रक्कम शिवदास राठोड यांचेकडेस देण्यास सांगितल्याने सदर लाचेची रक्कम शिवदास राठोड यांनी स्वतः पंचासमक्ष व काशिनाथ सोनवणे यांच्या समक्ष ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. कार्यालयात स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.