चोपडा रस्त्यावर अज्ञात ट्रकची दुचाकीला जोरदार धडक ; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
जखमी यावल तालुक्यातील तर दोन्ही तरुण अनोळखी
शिरपूर ((प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडा रस्त्यावर तरडी जवळ दुचाकीला अज्ञात वाहनांने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला असून या अपघात दोन तरुण जागीच मयत झाले असून एक तरुणी गंभीर जखमी झाले. सदर अपघात ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला आहे. या अपघातात भारती भावसींग पावरा (वय २४ रा.वाघदरा ता. यावल जि. जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र दोन्ही मयत तरुणाचे नाव गाव समजू शकले नाही.
सदर दोन्ही तरुण व तरुणी शिरपूर कडून चोपडाकडे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी एम एच 18 बिव्ही 3853 क्रमाकच्या दुचाकीने जात असताना शिरपूर तालुक्यातील तरडी-हिसाळे दरम्यान तरडी शिवारात दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरपूर कडे जाणाऱ्या एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन्ही अज्ञात तरुणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भारती पावरा हे गंभीर जखमी झाली अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळा वरून पसार झाला.घटनेची माहिती मिळताच हिसाळे येथील ग्रामस्थांनी धाव घेत 108 क्रंमाकांच्या अम्ब्युलन्सने उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ हिरेन पवार यांनी जखमींना तपासणी करून दोघा तरुणांना मयत घोषित केले. तर जखमी तरुणीवर तात्काळ उपचार सुरू केला. याप्रकरणी वार्डबॉय नितेश गवळी यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच थाळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय कृष्णा पाटील यांनी पथकासह धाव घेत पाहणी केली.