अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठा महासंघांची अमळनेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक -अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांनी सन १९०० या वर्षी स्थापन केलेल्या या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बी.बी.भोसले यांनी तालुक्यात बैठक घेऊन मराठा समाजाच्या विविध समस्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून उमेश पाटील (ढेकु) यांची जिल्हाध्यक्ष भोसले यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली. उपाध्यक्ष म्हणून सुरेश पाटील (जानवे) व रमेश पाटील (मांडळ) तर सरचिटणीसपदी राजेंद्र पाटील (सावखेडा) व चिटणीसपदी राहुल पाटील (आर्डी), मिडिया प्रतिनिधीपदी प्रविण पाटील (गोवर्धन) यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व हितचिंतक व मित्र परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.