महाराष्ट्र
थाळनेरला गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
शिरपूर (ॠषिकेश शिंपी) भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवार रोजी सकाळी निधन झाले. म्हणून त्यांचे आजोळ शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश मराठे, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, जिल्हा परिषद सदस्य भैरवीताई प्रेमचंद शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, अनिल मराठे, भटू शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील, उज्वल निकम, शांताराम कोळी, प्रताप मराठे, प्रेमचंद शिरसाठ, अनिल मराठे, बिंदू मराठे, महेंद्र बाविस्कर, विकास पाटील, मनोज मराठे, सुनील पाटील, हेमराज मराठे, सुभाष शिरसाठ, भूषण तलवारे, नितीन पाटील, पत्रकार हेमंत चौधरी व बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



