नंदलाल पठे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेऊन, खत्री बंधून वर गुन्हा दाखल करा !
विश्ववेध राज्य पत्रकार संघाचे पोलीस अधिक्षक जळगाव यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) आज रोजी विश्ववेध राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील ,राज्य कार्याध्यक्ष अशोराज तायडे यांनी पोलीस अधिक्षक जळगाव यांना नंदलाल पठे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेऊन, खत्री बंधू हरीश खत्री व अमर खत्री यांच्यावर गुन्हा दाखल करन्याची मागणी केली,
नंदलाल पठे हे खत्री बंधू जे बेकायदेशीर व्यवसाय शहरात करीत आहे. त्या विरुद्ध त्यांनी बातम्या प्रसिद्ध केल्याने खत्री बंधूनी नंदलाल पठे यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून लेखणी बोधट करण्याचा हा प्रयत्न असून जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरपणे बघावे अन्यथा कठोर आंदोलन करणार असल्याचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील व राज्य कार्याध्यक्ष अशोराज तायडे यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना म्हटले. पत्रकारांवर कुठल्याच प्रकार चा अन्याय विश्ववेध राज्य पत्रकार संघ ह्या पुढे चालू देणार नाही असेही ते यावेळी बोलले यावेळी राज्य सल्लागार युवराज वाघ, राज्य उपाध्यक्ष जगदीश गाढे, भीमराव सोनवणे , खंडू महाले,व इतर पत्रकार मंडळी उपस्थित होती.