शिंदखेडा येथील दिव्यांग मुलांना स्वयंसेवी संस्थांनी चालवित असलेल्या शाळांना अनुदान द्यावे ; शिष्टमंडळाचे धनंजय मुंडेंना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) दिव्यांग मुलांसाठी राज्यभर स्वयंसेवी संस्थेमार्फत शाळा चालवल्या जातात गेल्या दहा वर्षापासून या शाळा विनाअनुदान तत्त्वावर चालविल्या जात आहेत. राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही आणि म्हणून या शाळा चालवणं स्वयंसेवी संस्थांना जिकरीचे झालेलं असल्याने या संस्थांना अनुदान मिळावं म्हणून माजी आमदार रामकृष्ण तात्यासाहेब पाटील शिंदखेडा जिल्हा धुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून दिपचंद पाटील शिंदखेडा यांनी नामदार धनंजय मुंडे यांना त्यांच्या दालनात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करून अनुदान देण्यास संदर्भात अनुदान देण्यासंदर्भातील विनंती केली. त्यावर नामदार धनंजय मुंडे यांनी लवकरच मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वयंसेवी संस्था चालकांनी नामदार धनंजय मुंडे यांचे आभार मानले.