अमळनेरात २० फेब्रुवारी पासून हिवाळी कराटे प्रशिक्षण शिबिर
रोटरी क्लब, अमळनेर पत्रकार संघ व दामिनी पथकाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लबतसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि अमळनेर पोलीस स्टेशन मधील दामिनी पथक यांच्या सुयक्त विद्यमाने हिवाळी कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि. २० फेब्रुवारी पासून अमळनेरात करण्यात आले आहे.
सदर शिबिर डी. आर. कन्याशाळे जवळ, रोटरी हॉल, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६ ते ७ व ७ ते ८ या वेळेत होणार आहे. सदर शिबिरात ज्यूदो कराटे सिकई तायकांदो प्रशिक्षण १ महिना मोफत आहे. पण कराटे ड्रेस घेणे आवश्यक आहे. ज्यूदो कराटे प्रशिक्षण मुला-मुलींसाठी आहे यात वयाची अट नसून पण सातत्य आवश्यक आहे. शिबिरात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक शिबिरार्थीला ‘सन्मान पत्र’ व उत्कृष्ठ व्यायाम करणाऱ्याला ‘क्रिडा ट्रॉफी देण्यात येईल. शिबिरात प्रशिक्षण दिले जाणारे सर्वच खेळ ‘शालेय खेळ’ असल्यामुळे त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी कराटे ड्रेस आवश्यक आहे. तरी सदर शिबिराचा विद्यार्थी मित्रांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष वृषभ पारख, सेक्रेटरी प्रतिक जैन रोटे,प्रोजेक्ट चेअरमन योगेश येवले व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या शिबिरात मुख्य प्रशिक्षक एस.वाय.करंदीकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू मास्टर सुशिल करंदीकर आणि राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा करंदीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी 9226785560 यावर संपर्क साधावा.