न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्री-प्रायमरी मोफत ; वर्गात बालगोपाळांचे जल्लोषात व मोठ्या उत्साहात स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षापासून लहान मुलं प्रत्यक्ष शिक्षणासाठी वंचित झाले होते. शाळेची ओढ त्यांना लागली होती. कोरोना नियमांचे सर्व नियम पाळून बालकांना आज मोफत प्रवेश देऊन त्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणाचा श्री गणेशा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेत येणारा बालक कार्तिक श्याम पाटील यांच्या हस्ते रिबन कट करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकाला चंदन कुंकुम तिलक करून औक्षण करण्यात आले. समृद्धीचे प्रतीक असणार धान्य तांदूळ तबक तयार करण्यात आले त्यावर प्रत्येक मुलाने अक्षरे गिरवली मुलांना खाऊचे वाटप करून मुलांना वर्गात दाखल करून घेण्यात आले. शिक्षिका निता जाधव, रितिका मार्कंडेय यांनी मुलांना अनोख्या पद्धतीने मुलांच्या आवडीनुसार वर्गात घेतले. पूर्णवेळ मुलांनी गाणी धमाल-मस्ती केली. मुख्याध्यापिका प्रेरणा पाटील यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले शिक्षिका स्नेहा एकतारे, योगिनी ओवे, दिपाली पाटील, विद्या पाटील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.