अमळनेर
डी आर कन्याशाळेत सानेगुरुजी जयंती व प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा.शि.मंडळाच्या डी आर कन्याशाळेत सानेगुरुजी यांची जयंती व प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी या दोन्ही विभुतींवर विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षक एल.सी.बंजारा यांनी मी सानेगुरुजी बोलतोय ही कविता सादर केली. तसेच शिक्षक के.ए.पाटील, आर.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकुर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा साबे यांनी तर आभाराचे काम रत्नमाला सोनवणे यांनी केले. पर्यवेक्षणाचे काम व्ही.एम.पाटील, रत्नमाला सोनवणे, प्रतिभा शेवाळे यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.