महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री असताना कोळी समाजावर दुर्लक्ष
मालपुर (गोपाल कोळी) ज्या वेळेला काँग्रेसचे आमदार असतांना विधानसभामध्ये टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी समाजाच्या प्रशनांना वाचा फोडला होता. आम्ही त्या बद्दल तुमचे ऋणी आहोत. पण आता तर तुम्ही स्वता मंत्री आहात राज्यात तुमचे सरकार आहे. तरी तुम्ही सरकार कडुन कोणतीही समस्या सोडुन घेऊ शकता.
तुमच्या कडे जेवढे अधिकार आहेत. तरी तुम्ही अजुन पर्यंत विधानसभेत एकही समस्या मांडली नाही का ? तुमची भुमिका फक्त अशी झाली आहे. विरोधात राहिले का आगळ्यां वेगळ्या समाजाच्या समस्या मांडणे आणि सत्तेत आल्यावर कुठल्या तरी बिळात जाऊन लपणे मंत्री मोहदय लवकर आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या समस्या विधानसभेत मांडा अन्यथा तुमच्या विरोधात समाजाची दिशाभूल करण्याबाबत तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व धुळे जिल्ह्यात मंत्री व आमदार यांना धुळे जिल्ह्यात फिरवू देणार नाही, अशी ग्वाही गोपाल चव्हाण (शहराध्यक्ष वाल्या सेना ग्रुप दोंडाईचा) यांनी दिली आहे.