गुन्हेगारी
३२ वर्षीय महिलेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा
धुळे (प्रतिनिधी) शहरातील नकाणे रोडवरील एकवीरा नगरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील मेघना देवेंद्र राऊळ (वय ३२) ही महिला नकाणे रोडवरील एकवीर नगरात आपल्या माहेरी आली होती. तिने राहत्या घराच्या छताल असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्य साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांनी तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी तपासून महिलेस मृत घोषित केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक बी आर पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत.