महाराष्ट्र
शंकर नगर येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न
देगलूर (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे महाराष्ट्र-गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष जी.व्हि.स्वामी यांची तर महाराष्ट्र प्रदेश सदस्य म्हणून नरसीचे पोस्ट मास्तर तथा डाक कर्मचारी पतसंस्थेचे विघमान चेअरमन जि.व्हि.भिंलवडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर गाढे, बहावोद्दिन शेख, जाकीर देसाई, शरफोदिन मास्तर, पोस्ट मास्तर मिलिंद देऊळकर, तानाजी शिंदे, यडपलवार, अब्दुल रहीम पाशा पटेल, कविता बडुरे, दोसलवार, सायलु उठवाड, अजय वाघमारे, राजू बामणीकर, कांबळे, गजभारे, सेवानिवृत्त पोस्ट मास्तर रावळकर,पांचाळ, पत्रकार जावेद अहमद यांच्यासह परिसरातील अनेक डाक कर्मचारी उपस्थित होते.