अट्टल घरफोड्या डीके पोलिसांच्या जाळ्यात
चोरी, घरफोडीचे ९ गुन्हे दाखल : ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे (स्वप्नील मराठे) शहरातील चोरी आणि घरफोडीचे ९ गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा नियाज अहमद अजीज खान उर्फ डीके हा बांधकामाचे साहित्य चोरीच्या प्रकरणात चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील ऐशी फुटीरोडवरून चोरीला गेलेले बांधकाम साहित्य पोलीसांची जप्त केले
मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरात राहणारे दीपेश वसंत अग्रवाल यांचे ८० फुटीरोडवरील केडी कॉम्प्लेक्स येथे स्टीलचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान बंद करून घरी गेले. दुकान बंद असल्याची संधी साधून चोरट्याने हातसफाई केली होती. त्यात ४८ हजार रुपये किमतीचे तारांचे ४० बंडल, २६ हजार . ५०० रुपये किमतीचे निपल असे साहित्य लांबविले, चोरीची ही घटना १७ रोजी रात्री ८ ते १८ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी १९ फेब्रुवारीला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी नियाज अहमद अजिज खान उर्फ डीके (वय ३५, रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) या.मजुरी करणाऱ्या तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला होता.



