शिंदखेडा येथे शिवसेनेच्या वतीने जनता दरबाराचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात वरपाडे रोडवरील शिवाजी चौकात आठवडे बाजार दर सोमवारी शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन होत आहे. यात शिंदखेडा येथे सोमवार हा आठवडा बाजार असल्याने शहर व परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणावर बाजारात उपलब्ध होत असताना त्यांना विविध प्रकारच्या शासकीय कार्यालयात समस्या अडीअडचणी ना सामोरे जावे लागते.
अनेकदा किरकोळ कारणावरून हेलपाटे मारावे लागतात म्हणून सर्व स्तरातील समस्या चे निराकरण करण्यासाठी एक हक्काचे दालन असावे. या संकल्पनेतुन शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे जनता दरबार होय.त्याद्वारे शहर व परिसरातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांचे समस्या जागेवर सोडविण्याचे काम स्वत जिल्हा प्रमुख दिवस भर बसून करित असतात.शासकीय कार्यालयात काही अडचणी असतील तर संबंधीताना फोन करुन तीचे निराकरण केले जाते.या उपक्रमाबाबत सर्वसाधारण नागरिक समाधानी असल्याचे बोलले जात आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी, संजय आखडमल, युवराज पाटील, ज्ञानेश्वर साळुंके, चतुर पाटील, संतोष बोरसे, आर. आर. पाटील, चेतन पाटील, मनोहर सोनवणे, अक्षय कानडे आदी उपस्थित होते.तसेच हयाकामी तालुकाप्रमुख गिरीश देसले, शहरप्रमुख संतोष देसले ,संघटक गणेश परदेशी, समन्वयक विनायक पवार आदी पदाधिकारी चे सहकार्य लाभत आहे.