जळगाव जिल्हा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाचणखेडे ग्रामस्थांचे धरणे आंदोलन !
जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील नाचणखेडे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर, गावठाण व शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात गावातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी देण्यात आल्यात. परंतू अद्यापपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे.