चला जाऊया पाडळसरे धरणावर ; आमदार अनिल पाटलांचा आवाहनामुळे धरणावर जमला धरण प्रेमींचा मेळा
प्रत्यक्ष नदीपात्रात काँक्रीट कामाचा आमदार अनिल पाटलांच्या हस्ते शुभारंभ,155 मीटर पर्यंत होणार प्रस्तंभ बांधकाम
अमळनेर (नुरखान) तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यासह व परिसरातील शेतकरी आणि जनतेसाठी नवसंजीवनीच दरम्यानच्या काळात खंड पडलेल्या धरणाच्या कामात गती येत असल्याने या कामास सर्व धरण प्रेमींच्या सदिच्छा मिळाव्यात म्हणून आ.अनिल पाटील यांनी दि 6 मार्च रोजी धरण पाहणीचा सामूहिक दौरा आयोजित केला होता.यानिमित्ताने त्यांनी तमाम पाडळसरे धरण प्रेमी आणि राजकीय , सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवाना “चला जाऊया पाडळसरे धरणावर” असे भावनिक आवाहन केले होते,रविवारी सकाळी 9.30 वाजता हा धरण पाहणी दौरा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष-माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, प्रमुख उपस्थिती माजी आ.डॉ बी एस पाटील,चोपडा चे माजी आमदार कैलास पाटील,चोसाका चेअरमन घनश्याम पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,विनोदभैय्या पाटील, जि प सदस्या सौ जयश्री पाटील,महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ सुलोचना वाघ,अधीक्षक अभियंता वाय के भदाणे, ग्रंथालय विभागाच्या सौ रिता बाविस्कर,सौ सुनीता बी पाटील,प्रा रंजना देशमुख, योजना पाटील,कविता पवार,आशा चावरिया, माधुरी पाटील व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच राजकीय सामाजिक पदाधिकारी .
प्रास्तविक कार्यकारी अभियंता पी आर पाटील –
1988 साली तापी खोरे मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मात्र तांत्रिक व आर्थिक कारणामुळे गती मिळाली नाही 2019 पासून आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातले,ते बांधकाम क्षेत्रातील असल्याने फायदा,त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना धरणावर आणून महत्व पटवून दिले,त्यानंतर बऱ्याच बैठका झाल्या,आयआयटी पवई कडून नवीन डिझाईन चा प्रश्न सुटला,मागील बजेट मध्ये 140 कोटी निधी आणला, तांत्रिक अडचणीमुळे तो निधी शिल्लक असला तरी आमदारांच्या प्रयत्नाने तो निधी खर्च करण्यास मुदत मिळू शकेल.
आमदार अनिल पाटील धरणावर झालेली पत्रकार परिषद
आज प्रत्यक्ष धरणाचे प्रत्यक्षात आतमध्ये काँक्रीटीकर काम काम सुरू करताना आनंद होतोय,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांचे आभार मी मानतो,मागील पाच वर्षात युती शासन असताना धरणाचे काम ठप्प होते, पण या महाविकास आघाडी शासनाच्या काळात पुन्हा सुरू झाले,यासाठी दोन वर्षात सातत्याने बैठका झाल्या 90 ते 95 टक्के तांत्रिक अडचणी दूर झाल्यात आता काँक्रीट काम सुरू झाल्याने प्रत्येक पेअर 10 मीटर पर्यंत मे पर्यंत पूर्ण होईल,एकूण 156 मीटर पर्यंत पिअर्स काम पूर्ण झाल्यावर मग धरणाचे वरचे कामही सुरू होईल,पाणी उचलण्यासाठी लिफ्ट देखील आवश्यक असल्याने येथे 5 लिफ्ट योजना मंजुर करीत असून त्यासाठी सब स्टेशनची मागणीही वीज कंपनीकडे केली आहे,या धरणामुळे 40 हजार हेक्टर अमळनेर तालुक्यातील जमीन ओलीत खाली येणार आहे,व आजूबाजूचे जिल्हे आणि तालुक्यांनाही फायदा होणार आहे.धरणाची आजची किंमत 3200 कोटी झाली आहे,युक्रेन व रशिया युद्धमुळे ती वाढूही शकते,राज्य शासनाकडून 25 हजार कोटी कर्जाची केंद्रा शासनाकडे मागणी आहे, त्यातून निधी मिळू शकतो याशिवाय थेट केंद्राच्या योजनेत बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत,आतापर्यंत 495 कोटी रुपये खर्च धरणावर झाला आहे,मात्र पुढच्या मार्च पर्यंत 700 ते 800 कोटी निधी खर्च झाला असेल,युती शासनाने लक्ष दिले असते,जिल्ह्यातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी लक्ष दिले असते तर कामास गती येऊन आज हे पाणी आपण वापरू शकलो असतो पण त्यांनी छदाम त्यांनी दिला नाही अशी खंत आमदारांनी व्यक्त केली.
अरुण भाई गुजराथी
या धरणासाठी तांत्रिक बाब आणि आर्थिक बाब महत्वाची, धरण पूर्ण न झाल्याने 250 टीएमसी पाणी या नदीतून निघून जाते याची खंत आहे,पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे,रोटी कपडा मकान सब झूट, पाणी असेल तर सर्व काही नाहीतर सर्व व्यर्थ आहे,तांत्रिक प्रश्न महत्वाचे असतात,जेव्हा धरण पूर्ण होईल तेव्हा अनिलंदादा आणि बी एस आबा यांचा चेहरा लोकांना भाकरीत दिसेल,राज्य शासनाकडून हे धरण पूर्ण होणार नाही ,पैशाने महाराष्ट्र श्रीमंत पण पाण्याने गरीब आहे,,पाण्यासाठी एकजूट झालेच पाहिजे, राज्यातील केंदीय मंत्र्यांची मदत घेतली पाहिजे,धरणाचा फायदा घेतलाच पाहिजे,आहे त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो का याचाही प्रयत्न देखील व्हायला पहिजे,केंद्र आणि राज्य सरकार यांनी शिक्षण, आरोग्य आणि पाणी यासाठी निधी प्राधान्याने दिला पाहिजे, अनिलं पाटील धरणाला गती देताय याचा आनंद आहे,सर्वांनी एकत्र येऊन राज्य आणि केंद्राकडून निधी आनन्याचा संकल्प करू या असे त्यांनी सांगितले.
डॉ बी एस पाटील
आपलं हे धरण म्हणजे हे उभारण्याची मोठी स्टोरी आहे,स्व.गोपीनाथ मुंडे यांनी प्रकल्पाचे भूमीपूजन केले,त्यावेळी बऱ्याच अडचणी आल्यात,मात्र ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांनाच आता अधिक लाभ झाला आहे,धरण होणे म्हणजे त्यामागे अनेक अडचणी असतात,मात्र त्याचे फायदेही खूप आहेत, फायदा केला,धरणाचा फायदा राजकारणी लोकांनाही अधिक होतो,यासाठी त्यांनीही लक्ष घातले पाहिजे, या धरणाची आज 3000/- कोटी किंमत आहे,केवळ राज्याकडून प्रकल्प पूर्ण होणार नसून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा गरजेचा आहे, महाराष्ट्राचे असलेले केंद्रीय मंत्री ना गडकरी यासाठी मदत करू शकतात असे त्यांनी सांगून आमदारांच्या अवहनानुसार येथे जमलेली गर्दी पाहुन सर्वांच्या धरणा साठी सदिच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे असे त्यांनी सांगितले.
या वेळी पाडळसरे ग्रामस्थ मंडळ,सरपंच शुभांगी सचिन पाटील, उपसरपंच शिवाजी कौतिक पाटील, ग्रामसेवक सुभाष भोई, सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश पाटील, दिलबर भिल, भारतीबाई कोळी, कविता पाटील, वच्छलाबाई भिल, आक्काबाई भिल, कर्मचारी गोपाल कोळी, घनश्याम पाटील, सुखदेव कोळी, भागवत पाटील, शत्रुघ्न पाटील, जगदीश पाटील, सचिन पाटील संजय पाटील, रवींद पाटील, भुषण पाटील, जयसिंग कोळी, समाधान पाटील, दिनेश कोळी, वसंतराव पाटील, मंगल पाटील, अविनाश पाटील, भिला दादा कोळी, रमेश पाटील, राजेंद पाटील, गोलु पाटील.आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन-भागवत पाटील यांनी केले.