देगलूर येथील शासकीय विश्रामगृह व सा. बांधकाम विभाग कर्मचारी निवास लोकार्पण सोहळा संपन्न
देगलूर (मारोती हनेगावे) देगलूर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देगलूर येथील शासकीय विश्रामगृह, व सा. बाधकाम, अधिकारी, कर्मचारी निवासचे नवीन इमारतीचे लोकार्पण ना.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, तसेच महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस उपाध्यक्ष आमदार अमरभाऊ, राजूरकर, देगलुर बिलोलीचे आमदार जितेश अंतापुरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर तसेच सर्व देगलुर बिलोली मतदार संघातील जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य देगलूर नगरपालिकेतील महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्व नेते, काँग्रेसचे सर्व पदाधीकारी यावेळी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. देगलूर शहर हे तेलंगणा, महाराष्ट्र, व कर्नाटक, यांच्या सीमेवरील अत्यंत महत्वाचे शहर असून यामध्ये मोठी बाजारपेठ आहे. तिन राज्यातील लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत असतात. सार्वजनिक शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्याने देगलूरच्या वैभवा मध्ये भर पडली असून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा निवासस्थानाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.