लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा व्हावी ; प्रदेश तेली समाज महासंघ युवक आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील प्रदेश तेली समाज महासंघ युवक आघाडीच्या वतीने धरणगाव व धुळे येथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदार सुनील सैदाणे यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.

निवेदनातून धरणगाव जि.जळगाव येथील एका सहा वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमांने लैंगिक अत्याचार केला.तशाच प्रकारची घटना देवपूर धुळे येथील कृषी काॅलनी येथे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.तरी आम्ही झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. तसेच दोषींवर कठोर कारवाई व शिक्षा झाली पाहिजे.त्यामुळे अशा घटनांना अंकुश बसेल.अशा दुर्भाग्य घटनांचे प्रमाण महाराष्टात वाढले आहे.कायदयाचा धाक आता शिल्लक नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशी कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व पिडीत चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी नगरपंचायत विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक दिपक चौधरी, विनोद चौधरी, उमेश चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र चौधरी, देविदास चौधरी, चतुरलाल चौधरी, निंबा चौधरी, लोटन चौधरी, हरिष चौधरी, प्रमोद चौधरी आदी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.



