रुग्णवाहिका खरेदीचा कार्यादेशबाबत जिप सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते ठराव
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषार विश्वासराव रंधे यांच्या संकल्पनेनुसार १३ वा व १४ वित्त आयोगाच्या रकमेतून आदिवासी व पेसा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ८ रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या ऐतिहासिक निर्णय मागील ११ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतला. या खरेदीची प्रशासकीय मान्यता १७ अगस्ट २०२१ रोजी देण्यात आली. १९ जानेवारी २०२२ रोजी जिप सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते रुग्णवाहिका खरेदीचा कार्यादेश बाबत ठराव करण्यात आला.
रुग्णवाहिका हस्तातरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अब्दुल सत्तार माजी शालेय शिक्षण मंत्री आ अमरीशभाई पटेल माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल माजी मंत्री खा सुभाष भामरे खा हिनाताई गावित आ काशीराम पावरा आ कुणाल पाटील आ मंजुलाताई गावित आ किशोर दराडे आ सुधीर तांबे महापौर प्रदीप कर्पे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार डॉ तुषार रंधे उपाध्यक्षा कुसुमताई निकम व सीईओ सी वान्मथी आमंत्रित केले आहे. तसेच सर्व जिल्हा परिषद सभापती सदस्य पंचायत समिती सभापती व ग्रामीण लोकप्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून करण्यात येत आहे. रुग्णवाहिका हस्तातरण सोहळा उद्या दिनांक २१/०२/२०२२ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता जिल्हा परिषद धुळे प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे