जळगाव, धुळे व नंदूरबार या खान्देश परीसरातील निर्मिती, पारेषण व वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जळगाव, धुळे व नंदूरबार या खान्देश परीसरातील निर्मिती, पारेषण व वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन न्यू क्लब हाऊस औष्णिक वीज निर्मिती केंद्र दिपनगर (भुसावळ) येथे करण्यात आले होते, सदर मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून विजय राठोड मुख्य अभियंता, अर्चना विजय राठोड तसेच प्रमुख वक्त्या अनघा कुलकर्णी विभाग सेवा प्रमुख, राष्ट्र सेविका समिती यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनिताताई नाईक यांनी भूषविले होते, सकाळी १० ते ०५ वाजेपर्यंत चाललेल्या या मेळाव्यास खान्देश परिसरातील एकूण २३५ महिलांच्या उपस्थितीने सभागृह पूर्णपणे भरलेले होते. या मेळाव्याच्या रचनेत वीज निर्मिती केंद्र जवळून बघण्याची व वीज निर्मिती प्रक्रिया समजून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यासाठी प्रशासनातर्फे वीज निर्मिती केंद्रातील अधिकार्यांमार्फत निर्मितीची सविस्तर माहिती व बसची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली होती, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गीतगायन, प्रास्ताविक,आभार प्रदर्शन एकूणच सर्व संचलन हे महिलावर्गाने अगदी चोखपणे व व्यवस्थितरित्या सांभाळून “मै भी छूँ सकती हूँ आकाश, मुझे मौके की है तलाश” या उक्तीप्रमाणे प्रात्यक्षिक स्वरुपात दाखवून दिले. यात ०८ ते १० महिला भगिनींनी त्याठिकाणी उस्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त करून कामगार महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कल्पकतेच्या व सुनियोजित केलेल्या रचनेबद्दल गौरवोद्गार व्यक्त करुन हे केवळ कामगार महासंघामुळेच शक्य झाल्याचे व वारंवार महिलांसाठी अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मेळाव्यास उपस्थित महिलांसाठी चहा, नास्ता व जेवणात पुलाव, कढी, जिलेबी, भरीत व कळण्याची पुरी अशा खास खांदेशी मेनूची व्यवस्था करण्यात आलेली होती. सर्व महिला- भगिनींना संघटनेतर्फे हृदयस्पर्शी आठवण म्हणून एक कलाशिल्प (मोमेंटो) सप्रेम भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात व नियोजनात तिन्ही कंपनीतील प्रदेश, कंपनी, प्रादेशीक, परिमंडळ, मंडळ व विभागस्तरावरील सर्व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.