मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार २०२२ प्रा जयश्री दाभाडे यांना जाहीर
नाशिक येथे होणार गौरव...राज्यातील 100 महिलांचा होणार सन्मान..!जळगांव जिल्ह्यातील एकमेव अमळनेर तालुक्यातून निवड...
अमळनेर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार 2022 जाहीर झाला असून नाशिक येथे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल.
या संदर्भात प्रा जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या महिलांचा सन्मान या संस्थे मार्फत केला जातो. प्रा दाभाडे ह्या सातत्याने वंचित दलित,आदिवासी, महिला,बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यन्त कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. अनेक आंदोलने, उपोषण, अर्ज निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे. वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कार्य करणाऱ्या प्रा दाभाडे यांनी गेल्या 26 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. आपला वेळ, पैसा, बुद्धिमत्ता इ समाज, वंचित घटकांसाठी त्यांनी दिला आहे. या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय,शासकीय पातळीवर घेण्यात आली असून 56 पुरस्कार प्रा दाभाडे यांना प्राप्त झाले आहेत.आता हा 57 वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात राज्य पातळीवर दखल घेऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्क्रूटिनी समितीमार्फत सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर आलेल्या नॉमिनेशन मधून वर्गीकरण करून राज्यातील 100 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह, गौरवपदक, मानाचे महावस्त्र, मानपत्र, मानकरी बॅच, आणि मानाचा फेटा असे स्वरूप या गौरवाचे असणार आहे. प्रा जयश्री दाभाडे यांना जाहीर झालेल्या ह्या राज्यस्तरीय पुरस्काराने निश्चितच अमळनेर करांची देखील मान उंचावली असून अमळनेर चे नाव राज्य पातळीवर गेले आहे. प्रा दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
राज्य स्तरीय सन्मान निश्चितच अभिमानास्पद : जयश्री दाभाडे
मला जाहीर झालेला हा राज्य स्तरीय सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे. सतत कार्य सुरू आहे. गेल्या अनेक वर्षात मी माझ्या कार्यात उसंत घेतली नाही. पुरस्कारांनी जबाबदारी वाढते.अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. अर्थातच काम करत असताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अश्या पुरस्कारांमुळे नव्याने उत्साह निर्माण होतो. अमळनेर करांनी मला खूप प्रेम व सहकार्य दिले आहे. त्यामुळे मी कार्य करू शकते असेच सहकार्य असू द्यावे, असं जयश्री दाभाडे म्हणाल्या.