जळगाव जिल्हा
यावल पंचायत समिती सा.प्र.विभागात बत्ती गुल्ल परंतु BDO यांच्या दालनात प्रकाश
जळगाव (प्रतिनिधी) यावल पंचायत समिती मध्ये आज दि.०८ मार्च २०२२ रोजी मंगळवार दुपारी १.३० वाजेच्या सुमारास खेडे-पाड्या वरून येणाऱ्या नागरिकांची लाईट नसल्याकारणाने कामाची पूर्तता न करताच निराशा जनक वापसी करावी लागत आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबधीत BDO यांच्या दालनात लाईट नसताना देखील INVERTOR द्वारे प्रकाशाची पूर्तता दिसून आले.
तसेच बाहेरील गेलेरी मध्ये देखील सगळीकडे दिवाचा उजेळ दिसला परंतु सामान्य प्रशासन विभागात लाईटची सुविधा दिसून येत नाही आणि त्या ठिकाणी बंद पडलेले INVERTOR आपणास सहज दिसून येतात. याबद्दल BDO यांना विचारणा केली असता त्याने उत्तर देत असे सांगितले कि, ते माझे कार्य नाही. संबंधित अधिकारी यांच्याकडे आज रोजी पूर्ण पंचायत समिती सांभाळण्याचे काम दिले गेले आहे. त्यांच्या कडून असे उत्तर अपेक्षित नाही.