चोपड्यात ढोलताशांसह ‘भाजपाचा’ मोठा जल्लोष
चोपडा (विश्वास वाडे) अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश चोपडा तालुक्यात ढोलताशांच्या गजराने जल्लोषाला सुरुवात करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
काल दि.१० रोजी झालेल्या मतमोजणीत पाच राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश,गोवा,मणिपूर,उत्तराखंड या चार राज्यात घवघवीत यश मिळाले त्या यशाचे औचित्य साधून चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी ने मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.सर्वप्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले.तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले मारूती मंदिरात आरती करण्यात आली व पेढे चढविण्यात येऊन ढोलताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी,घोषणाबाजीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हा चिटणीस रंजना नेवे, ज्येष्ठ नेते तिलोकचंद शहा, आत्माराम महाळके, चंद्रशेखर पाटील, मुन्ना शर्मा, युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रकाश पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,सनातन धर्म तालुका प्रमुख यशवंत चौधरी, राष्ट्रीय सेवक संघाचे श्याम सोनार, सौरभ नेवे, अल्पसंख्याक ता.अध्यक्ष संजय जैन, शहर महिला उपाध्यक्ष सिमा सोनार, ओबीसी महिला मोर्चा शहर अध्यक्ष अरूणा पाटील, कैलास पाटील, सरचिटणीस हनुमंत महाजन, चंद्रकांत धनगर, सुनिल सोनगिरे, हेमंत जोहरी, शेखर सोनार, भरत मितावलीकर, विवेक गुजर, प्रशांत पाटील, मिलिंद वाणी, भरत सोनगिरे, विठल पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, विशाल म्हाळके, गजानन कोळी, डाॅ मनोज सनेर, रणछोड पाटील, शेखर ठाकरे, बापुराव पाटील, विलास चौधरी, आशिष पाटील, दिनेश जाधव, पिंटु बारेला, नितिन राजपुत, धर्मदास पाटील, अमित तडवी, दिनेश मराठे, पिंटू मजरेहोळ, तुषार पाठक, बारकु पाटील, अनिल धुपेकर, गिरीश पालीवाल, प्रशांत देशमुख, अनिल महाजन, गोपाल पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.