कृषी विभागातर्फे गोंदेगांव येथे शेतकरी मासिक वाचन व रब्बी हंगामपूर्व बिजप्रक्रिया सप्ताह साजरा
सोयगाव (जि.जळगांव) : विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : कृषी विभागातर्फे गोंदेगांव येथे शेतकरी मासिक वाचन व रब्बी हंगामपूर्व बिजप्रक्रिया सप्ताह कार्यक्रम रब्बी हंगामपूर्व मार्गदर्शन सप्ताह निमित्त
कृषि विभाग व आत्मा यंत्रणा यांचे वतीने आर.एल.इंगळे तालुका कृषि अधिकारी,सोयगाव, एस.जी.वाघ मंडळ कृषि अधिकारी, बनोटी व जे.के.जाधव मंडळ कृषि अधिकारी, फर्दापूर व ए.एस.महाजन बी.टी.एम,आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे- गोंदेगांव यथे शेतकरी मासिक वाचन व रब्बी हंगामपूर्व बिजप्रक्रिया सप्ताह कार्यक्रम दि.09/11/2021 रोजी आयोजित करण्यात आला यात हरभरा बियाण्यास जैविक बिजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक जे. एन वाघ कृषि सहाय्यक, गोंदेगांव यांनी करून दाखविले व ए.एस.महाजन बी.टी.एम यांनी शेतकरी मासिक वाचन करून सभासद होण्यासाठी आवश्यक माहिती व गट शेती या विषयी मार्गदर्शन शेतकरी वर्गाला केले. सदरील कार्यक्रमास गावातील सरपंच, उपसरपंच, कृषि मित्र व प्रगतिशील शेतकरी यांची उपस्थिती लाभली.