उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी यांची अभ्यास मंडळावर नियुक्ती
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून अण्णासाहेब गरवारे स्वायत्त महाविद्यालय, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रा.डॉ.ए.एल. चौधरी यांना आत्तापर्यंत विविध विषयावरील संशोधनासाठी चार फेलोशिप प्राप्त झालेल्या आहेत. त्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे २००५ मध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांना आजपर्यंत शास्त्र विद्यार्थी संघातर्फे ‘सन्मानपत्र’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार’, ‘नेशन बिल्डर्स अवार्ड’ आणि ‘समाजरत्न पुरस्कार’ प्राप्त झालेले आहेत. ते सध्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील ०७ विज्ञान व संशोधन विषयक संस्थांचे सदस्य व आजीवन सदस्य म्हणून काम पहात आहेत. २६ हून अधिक विद्यापीठ पातळीवरील विविध समित्यांवर कुलगुरू नामनिर्देशित तसेच सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. आतापर्यंत त्यांनी विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य, उपप्राचार्य, समन्वयक व संचालक अशा विविध पदांवर यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी ११ हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्र, परिषदांमध्ये सहभाग नोंदविला आहे.
३४ पेक्षाही अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय कार्यशाळा, १९ हून अधिक सेमिनारमध्ये सहभाग नोंदविला असून १५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांचे यशस्वीपणे आयोजन त्यांनी केले आहे. त्यांचे ०१ लघू संशोधन प्रकल्प व ०१ दीर्घ संशोधन प्रकल्प पूर्ण झालेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ०१ विद्यार्थी एम.फिल व ०१ विद्यार्थ्याने पीएचडी पूर्ण केली असून ०४ विद्यार्थी पीएच.डी.चेअध्ययन करीत आहेत. त्यांचे आजपर्यंत ३५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांची जवळपास २८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीभूत व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी अभ्यास मंडळावर असते. डॉ.ए.एल.चौधरी यांच्या कामाचा अनुभव पाहता त्यांची निवड होणे ही महत्वपूर्ण बाब आहे.त्यांच्या अनुभवाचा अभ्यास मंडळाला निश्चितच सुयोग्य अभ्यासक्रम बनविण्यासाठी फायदा होईल.
त्यांच्या या अभ्यास मंडळावरील निवडीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही. टी.पाटील, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे व उपप्राचार्य डॉ.के. एन.सोनवणे, रजिस्टर डी एम पाटील, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.