महाराष्ट्र
धारणी तहसीलमधील नांदुरी गावात अशी होतेय पिण्याच्या पाण्याची नासाडी
धारणी (इंद्रकुमार राजनकर) धारणी तहसीलच्या नांदुरीगावात पाण्याची टाकीची पाईप लाईन फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे. याकडे ग्रामपंचायतचे सरकारी कर्मचारी लक्ष देत नाहीत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या १५ दिवसांपासून हॅन्डपंप ना दुरुस्ती आहे. उन्हाळा सुद्धा लागला आहे, त्यातदेखील टाकीची पाईप लाईन फुटल्यामुळे पाणी वाया जातं आहे. ग्रामपंचायतच्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सागून देखील लक्ष देत नाहीत. तसेच टाकीची पाईपलाईन फुटल्यामुळे रीप्यरींग सुद्धा बरोबर केली नाही. गेल्या एक ते दोन वर्षापासून पाणी वाया जातं आहे. त्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचत असून रस्त्यात खड्डे पडले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, प्लंबर ही लोक झोपली आहेत का?, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.