गुन्हेगारी
तीन वर्षांपासून मोटर चोरीतील फरार संशयित आरोपीस सोनगीर पोलिसांनी केले जेरबंद
धुळे (विक्की अहिरे) तालुक्यातील बोरीस येथे ३ वर्षांपासून मोटर चोरीतील फरार संशयित आरोपीस सोनगीर पोलिसांनी शिताफीने अटक केली.
मोटर चोरीतील ३ वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपी अजय आनंदा मोरे रा. बोरीस ता. जि. धुळे यास सोनगीर पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली. सदरील आरोपी ३ वर्षांपासून फरार होता. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, सदरील आरोपी हा बोरीस गावात आलेला आहे. पोलिसांनी लागलीच त्यास बोरीस येथून अटक केली. त्याच्यावर ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरील कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. गिरासे व पोलीस शिपाई किरण पारधी यांनी केली.


