शिंदखेडा तालुक्यातील मेथी गटाचे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरेंची जि.प. सर्व साधारण सभेत अधिकारीवर घणाघात ; विविध विषयांवर आवाज
शिंदखेडा (यादवराव सावंत) आजच्या जिल्हा परिषद जनरल बोर्ड मध्ये माझ्या मेथी गटातील कारले या गावाला तीर्थ क्षेत्र विकासाचा दर्जा देणे बाबत आयत्या वेळच्या विषयात ठराव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या 21- 22 हया आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्या बद्दल मी जिल्हा परिषद अध्यक्षांची आभार व्यक्त केले.
तसेच दुसऱ्या बाजूच्या घेतला अध्यक्षांच्या दालनासमोरच्या पटांगणात त्या भंडार गृह काढून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा या बाबतचा ठराव करण्यास विनंती केली तसेच प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक दिनी २ लाखाचे तरतूद ऐवजी 5 लाखाची तरतूद करून मिळावी व आदर्श शिक्षकाचा सन्मान करावा याबाबत आग्रहाची भूमिका मांडली ज्या पद्धतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो तशाच पद्धतीने आदर्श शेतकरी पुरस्कार दिला जावा अशा पद्धतीची मागणीसुद्धा मी सभागृहात केले तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा ते लेखी उत्तर देत नाही अशा आशयाची तक्रार जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी केली त्याला अनुसरून मी जिल्हा परिषदेचे सीईओ वास्भन्ती सी यांना सांगितले की आमच्या जिल्हा परिषद मध्ये भास्कर वाघाचा भ्रष्टाचार करणारे सुद्धा एक मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि ते आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून श्रीमंत व श्रीवास्तव मनुकुमार श्रीवास्तव आज राज्याचे मुख्य सचिव आहेत परंतु आपण गेल्या साडे तीन-चार वर्षांमध्ये धुळे जी प चे वाटोळे केले आहे व आपल्या कामाची पद्धत अत्यंत चुकीची आहे, असे मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले. त्यास जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विषयी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली वास्तविक पाहता जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे याठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जे काम करण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु माझ्या मेथी गटातील मांडळ ते मालपुर या रस्त्याचे काम बदल करण्यात आले तसेच वरझडी ते अंजनविहीर हे काम सुद्धा बदल करण्यात आले याबाबत सुद्धा मी बांधकाम अधिकार्यांच्या विषयी तक्रार व्यक्त केली तसेच मेथी गटातील मेथी गावापासून राज्य महामार्ग क्रमांक 122 ला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले असून सुद्धा त्याठीकानी राजकारण आणून त्या कामाचे बिल देण्यात येत नाही याबाबत सुद्धा मी त्या ठिकाणी तक्रार केली जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकाऱ्यांच्या विषयी अनेक लोकांनी तीव्र नाराजी दाखवल्यामुळे मी स्वतः सांगितले की यांच्यावर अविश्वास आणल्यास सभागृहाने एकमत करावे असे वक्तव्य जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी जिल्हा परिषद येथे केले.