गुन्हेगारी

सुजित कपाटे यांची अवैध ढाबे व गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर धडक कारवाई

भुसावळ (अखिलेश धिमान) येथील विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि.जळगाव पथकाची अवैध ढाबे व गावठी हाटभट्टी निर्मीती केंद्रांवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे अवैध ढाबे व गावठी हाटभट्टी निर्मीती केंद्रांवर धडक कारवाई केल्याने अवैध ढाबे व गावठी हाटभट्टी निर्मीती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्माननीय आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक अं.व दक्षता उषा वर्मा मॅडम, तसेच विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग, नाशिक अर्जुन ओहोळ व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव सिमा झावरे यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक, सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि. जळगाव यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक १५/०३/२०२२ रोजी भुसावळ तालुक्यातील कन्हाळे येथे गावठी हाटभट्टी निर्मीती केंद्रांवर आणि यावल तालुक्यातील न्हावी येथील अवैध ढाब्यांवर छापा टाकुन गावठी हातभट्टी दारु,देशी दारु व बियरची अवैध रित्या विक्री करतांना एकुण ०८ गुन्हे नोंद करण्यात आलेले असुन त्यात रसायन ४४५० लि. गावठी दारु ८० लि. देशी दारू १७.२८ लि. बियर ९५.६० लि. असा एकुण रु. १,१८,९४०/- किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्येमाल जप्त केला असुन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांर्तगत कारवाई करण्यात आलेली आहे. सदर अवैध मद्यसाठा मिळुन आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याबाबत तपास सुरू आहे.

सदर कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओं.कपाटे, राज्य उत्पादन शुल्क,भुसावळ, राजेश निं.सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,भुसावळ तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख,सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ जवान नितीन पाटील, योगेश राठोड यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक अर्जुन ओहोळ आणि अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जळगाव सिमा झावरे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक सुजित ओं.कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश निं.सोनार हे करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे