चोपड्यात आंदोलकर्ते आठ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस.
चोपडा (जि.जळगांव) : विश्वास वाडे तालुका विशेष प्रतिनिधी
चोपडा : एस टी चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप सुरू आहे या संपात चोपडा आगारातील कर्मचारीही सहभागी झाल्याने संपाचा आज पाचवा दिवस आहे आंदोलन कर्ते आठ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस दिल्याने आठ निलंबित
चोपडा एस टी कर्मचाऱ्याचा संप सुरू असताना आज रोजी येथील डेपो मॅनेजर संदेश शिरसागर यांनी आठ कर्मचाऱ्यांना शाम भिका धामोडे (असिस्टड आर्ट), चंद्रकांत प्रकाश कोळी ( वाहक), सचिन भिका चौधरी (वाहक),प्रदीप माधव कोळी (वाहक), राकेश छगन रायसिग (वाहक), किशोर राजू पाटील ( वाहक), रविंद्र नारायण सोनवणे (वाहक), तौसिक एन.शेख (वाहक) या कर्मचाऱ्यांना आज रोजी निलंबन नोटीस देण्यात आली आहे त्या नंतर कर्मचाऱ्यानी गांधीगिरी करत त्या आठ कर्मचाऱ्यांना
कर्मचाऱ्यांना फुलांचे हार घालून कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला व आठच काय पूर्ण कर्मचाऱ्यांना निलंबन केलं तरी जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असे या निलंबित कर्मचाऱ्यांनी सांगितले.