संगीतम ट्रव्हल्स मधून ४० लाखाची चोरी
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) येथील एम.जी ग्राऊंड ते मुंबई प्रवास दरम्यान संगीतम ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमध्ये ठेवलेली ५०० रुपये चलनी नोटांनी भरलेली हिरव्या रंगाची बँग कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी मनोज बन्सीलाल बियाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २८/०३/२०२२ रोजी रात्री ११.३० ते दिनांक २९/०३/२०२२ रोजी ०८.०० वाजेच्या दरम्यान एम.जी.ग्राऊंड भुसावळ ते मुंबई प्रवास दरम्यान फिर्यादीचा विश्वासू संजय पुरुषोत्तम तिवारी राहणार मधु डेअरी विठ्ठल मंदिर वार्ड भुसावळ हे फिर्यादीची ४० लाख रुपयांच्या चलनी नोटा असलेली हिरवी रंगाची बॅगसह नाशिक येथे पोहचविण्यासाठी निघाले असता त्यांना झोप लागल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी संगीतम ट्रॅव्हल्स एम.एच.०३ सी.पी. ३४७७ चे डिक्कीतून ५०० रुपये दराच्या ४० लाख रुपयांच्या नोटा चोरी करून नेली आहे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या आदेशावरून गुरन २६२/२०२२ भादवी कलम ३७९ प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे.