गुन्हेगारी

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी !

मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर पासून जवळच असलेल्या पिप्री आकराऊत येथील यात्रेतून दि.22 मार्च मध्यरात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास परत येत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील खडसे पंपासमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुक्ताईनगर नगरपंचायतीचे दोघे कर्मचारी पैकी एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीआकराऊत येथे जत्रा भरलेली असून या यात्रेत जवळपासच्या सर्व गावातून यात्रेकरूंची गर्दी होत असते. अशाच प्रकारे यात्रा पाहण्याच्या ओढीने मुक्ताईनगर नगर पंचायतीत कर्मचारी असलेले रत्नदिप कोचुरे व संजय सोनार हे यात्रा पाहून दि 22 मार्च च्या मध्यरात्री 1 ते 1: 30 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडे परतत असतांना खडसे यांच्या पंपासमोर एका अज्ञात वाहने त्याच्या दुचाकी वाहनास धकड दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात रत्नदीप कोचुरे हे जागीच ठार झाले तर संजय सोनार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु होती. दरम्यान, मुक्ताईनगर नगरपंचायत मधील एक हसत मुख , व मनमिळावू असलेला कर्मचारी रत्नदीप कोचुरे यांच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे