विवेकानंद विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
चोपडा (विश्वास वाडे) येथील विवेकानंद विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयातील ओवी राधेशाम पाटील या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, प्रिन्सिपल सुरेखा मिस्तरी, बालवाडी विभाग मुख्याध्यापिका माधुरी भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. विद्यालयातील चौथी ची विद्यार्थिनी सृष्टी नरेंद्र महाजन व इंग्लिश मीडियम चा विद्यार्थी जयदीप सतीश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवी अ चा विद्यार्थी नक्षत्र कापुरे यांनी पोवाडा सादर केला.
उपशिक्षक अभिषेक शुक्ल व इंग्रजी विभागाच्या उपशिक्षिका योगिता अंबर पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी प्रकाश झोत टाकत साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली. त्यानंतर विद्यालयातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विभागाचे सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक जितेंद्र देवरे यांनी केले.