जळगाव जिल्हा
यावल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची निवड
जळगाव (प्रतिनिधी) परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निम्मित यावल शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्निल पारधे, उपाध्यक्षपदी विक्की गजरे, खजिनदार प्रदीप गजरे, सचिव निलेश सपकाळे, सहसचिव आकाश सुरवाडे, सल्लागार भिमराव गजरे, व सदस्यपदी अतुल पारधे, गौतम पारधे, मंथन महिरे, आकाश बिऱ्हाडे, पंकज ङांबरे भूषण तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.