गुरू रविदास क्लब तथा संत रोहिदास प्रतिष्ठानतर्फे संत रविदास जयंती कार्यक्रमाचे उद्या आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) येथील गुरू रविदास क्लब तथा संत रोहिदास प्रतिष्ठानतर्फे दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ बुधवार रोजी संत शिरोमणी गुरू रविदास यांच्या ६४५ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह, जाधव नगर, वाघ नगर, गिरणा पंपिंग रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे.
तसेच चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ .सुनील सूर्यवंशी, डॉ.संपतराव वानखेडे, धीमंत पी.आर. आंबेडकर, यशवंतराव ठोसरे, संजय वानखेडे, प्रा.विठ्ठलराव सावकारे, डॉ.सचिन गांगुर्डे, गणेश सुरळकर, खंडू पवार, मुकेश कुरील, प्रकाश रोझतकर, राजेश वाडेकर, प्रा .डॉ.सुनील निंभोरे, विजय पवार, कैलास वाघ,प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रदीप शेकोकारे, संजय बाविस्कर, डॉ.सुनील तायडे, अविनाश वानखेडे, गजानन दांडगे, प्रा संदीप शेकोकारे, अरुण नेटके, जगन निंभोरे आदींनी केले आहे.