जुगा देवी भागात गप्पा मारत बसलेल्या दोघांना मारहाण
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) शहरातील इंद्रप्रस्थ नगर क्रीडा संकुलन जुगा देवी भागात संध्याकाळी गप्पा मारत बसलेल्या दोघांना अंधारात अनोळखी इसामांनी मारहाण केल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सप्तमेश सुशीलकुमार खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २७/०३/२०२२ रोजी ज्ञानेश्वर गार्डन जवळ स्कुटी लावून इंद्रप्रस्थ नगर क्रीडा संकुलन मध्ये ०८.४५ वाजेच्या दरम्यान गप्पा मारत बसले होते. त्यावेळी चार अनोळखी इसम दोघां जवळ गेले असता या परिसरात प्रतिष्ठित लोक राहतात तुम्ही का आले म्हणून शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करू लागले. तसेच हातातील काठीने डोक्यात मारहाण केली व अंधाराचा फायदा घेत आरडा ओरड करून पळून गेले. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशावरून गुरुन ००४४/२०२२ भा.द.वि कलम ३२४,५०५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल सौय्यद करीत आहे.


