अवैधरीत्या झाडांची कत्तल, गुरुदत्त स्वामीलवर कारवाई करा ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी च्या वतीने गुरुदत्त स्वामील रेल्वे स्टेशन येथे बेकायदेशीर पद्धतीने ट्रक्टर द्वारे रात्री एक ते चार दरम्यान मुख्य रोडवरील झाडांची कत्तल करून.सदर स्वामील चे मालक वन विभागाची परवानगी न घेता चोरटय़ा पद्धतीने अवैध व्यवसाय करीत असल्याने कारवाई करावी यासाठी शिंदखेडा तहसीलदार सुनील सैदाणे यांना तालुकाध्यक्ष प्रविण मंगासे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
निवेदनातून गुरुदत्त स्वामील रेल्वे स्टेशन चे मालक निबांच्या झाडांची कत्तल करून ट्रक्टर द्वारे रात्री बे रात्री चोरटी वाहतूक करीत असतात. आमचे कुणीच काही करू आम्ही वरपर्यंत हप्ते पुरवितो.आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही.तुम्हाला जिथे तक्रार करायची असेल करा. अशी भाषा जाब विचारायला आलेल्या पदाधिकारी यांना देतात.स्वतःच्या आर्थिक फायदया साठी सर्रासपणे झाडांची कत्तल करून अवैध व्यवसाय सुरू आहे. स्वामील लगत रस्त्यालगत रोडच्या बाजूला तोडलेली झाडे टाकली आहेत.तरी ताब्यात घेऊन अज्ञात ईसमावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. रोडवर पडलेल्या झाडांमुळे अपघात देखील होत असतात. सदर मालकाची चौकशी करून कारवाई सात दिवसांत स्वामील सील करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रविण मंगासे, अमोल बैसाणे, हर्षदीप वेंदे, सिद्धार्थ पवार, सागर भदाणे, नवनीत नरभंवर आदी उपस्थित होते.