महाराष्ट्र

शॉर्ट्सर्किटने कदमवाडीतील घर पूर्णपणे जळून खाक

शित्तूर – वारुण : तालुक्यातील शित्तूर – वारुण पैकी कदमवाडी येथील घराला पहाटे 2:45 वाजता शॉर्टसर्किट ने लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील सौसार उपयोगी साहित्य, धान्य, कागदपत्रे, जळाली तर शेळ्यांचा कळप वरून पडलेल्या छापराखाली दबून जळून दबून गेला. गाई, बैल अगीने भाजले असून त्यांच्या वर वैध्यकीय उपचार सुरु आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली प्रत्यक्ष माहिती अशी, सदर घर तेरा खनी तिजयचे असून सात कुटुंबे इथे वेगळी वेगळी राहत होती. पहाटे 2:45 च्या सुमारास घराला आग लागल्याचे समजताच कुटुंबियांनी आरडा – ओरड करून लोक जमा केले आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. आगीची भीषण ता एव्हडी तीव्र होती कि राऊतवाडी, मगदूम वाडी, पाटिलवाडी, शित्तूर – वारुण इकडचे लोक ज्याला जशी माहिती मिळेल, आणि जसे जमेल तसे घटनास्थळी जाऊ न मदत करत होते. मुख्य रस्त्यापासून सुमारे दीड – दोन किलोमीटर डोंगरावर साधी मोटार सायकल जानेही जिकिरीचे आहे. सदरच्या आगीत नामदेव कुशाबा कदम (65 वर्ष ) हे भाजून गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी सी. पि, आर. कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी किरण पाटील, अनिल पाटील, संतोष मगदूम, उत्तम मगदूम तसेच सरपंच नीता पाटील, डेपोटी सरपंच लक्ष्मण पाटील, बाळासाहेब पाटील, तात्यासो पाटील, तानाजी भोसले तसेच विजयदादा खोत (माजी सभापती) उपस्थित राहून मदत करत होते तसेच ग्रामसेवक, तलाठी,आणि सर्कल, पोलीस पाटील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा केला.

सदरची घटना शॉर्टसर्किटने झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही जमेची बाजू मानली तरी, वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वेळकाढुपणाचे धोरणच कारणीभूत ठरते. वेळोवेळी निवेदने, विनंत्या करूनही जीर्ण विजेचे खांब आणि तुटत आलेल्या, पडलेल्या विजवाहक तारा बदलणे अजूनही जमले नाही, आजच्या या घटनेनंतर तरी विजवितरण ला उशिरा शहाणपणा सुचते का? याची चर्चा जणमाणसातून चालू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे