महाराष्ट्र
घुसर बु येथील ग्रामपंचायतीने हटवले रस्त्यावरील अतिक्रमण
मोताळा (संभाजी गवळी) घुसर बु येथील दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे मंजुरात असून सुद्धा अद्याप रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. त्या रस्त्यावरील अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्यामुळे तो रस्ता सुरुवात करण्यासाठी अतिक्रमण ग्रामपंचायतीची डोकेदुखी ठरत होते. ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव चा ठराव मंजूर करून जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यावेळी ग्रामसेवक लोखंडे, उपसरपंच उमेश वानखडे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक वानखडे, तानाजी जाधव, भागवत पाटील, सुनील तायडे, अर्चना दाभाडे, मंगला मुके, सुभाष दाभाडे, ज्ञानदेव वले, दीपक जाधव, काशिनाथ मोतीकार, कमलेश गाडेकर, नाना सावळे व ग्रामस्थ उपस्थित होते.