भिम आर्मी” भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिटचा पदविस्तार सोहळा यावल येथे उत्साहात संपन्न
यावल (अमित तडवी) भिम आर्मी” भारत एकता मिशन च्या सदस्यांमध्ये आनंद संचारला. भिम आर्मी” च्या जयघोषाने निनादला यावल बाजार समिती चा हॉल येथे “भिम आर्मी” भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे व संपूर्ण जळगाव जिल्हा युनिट ची आज जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आढावा व नवपदनियुक्त बैठक संपन्न झाली
सदर बैठकीवेळी जिल्हा प्रमुख मा.गणेश सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे व नवनियुक्त जिल्हा सहसचिव संतोष तायडे यांनी संबोधित करतांना संघटनेची पार्श्वभूमी, संघटना कशी असावी, संघटन बांधणी कशी करावी व सच्चा, निडर, निस्वार्थी, स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा यावर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाप्रमुख गणेश सपकाळे यांनी आपल्या पहाडी व करारी आवाजात मार्गदर्शन करून तरुण पदाधिकारी यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली व निस्वार्थी पणे, कोणताही लोभ न बाळगता,आपल्या स्वाभिमानाला जपून कार्य करण्याची शपथ घेतली.
तसेच “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगाव जिल्हाप्रमुख गणेश सपकाळे यांच्या यावल नगरपरिषदेतील नवनियुक्त मुख्यधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व शहरातील आंबेडकर नगर चे जीर्ण झालेले प्रवेशद्वाराचे पुनर्निर्माण करण्याची मागणी केली असता येत्या १४ एप्रिल च्या अगोदर काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्या कामामुळे स्थानिक समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले ही ताकद आहे “भिम आर्मी” भारत एकता मिशनची. मुख्यधिकारी यांची प्रथम भेट घेताच मागणी पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
सदर प्रसंगी भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा प्रचार-प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्धजी खरे, विजय सोनवणे, जिल्हा मूख्ख संघटक संदिप सपकाळे, जिल्हा संघटक नरेश बिऱ्हाडे, जिल्हा संघटक हेमराज तायडे, जिल्हा सह सचिव कलीम खान. कामगार युनियन प्रमुख शेख शकील, भुसावळ तालुका कार्याध्यक्ष महेश सपकाळ भुसावळ, तालुका मुख्य संघटक जावेद शेख, भुसावळ तालुका उपसंघटक विशाल वाघमारे, यावल-रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर, यावल तालुका प्रमुख पंकज डांबरे, यावल तालुका व शहर युनिट चे सर्व पदाधिकारी तसेच सनी पारधे, अतुल पारधे, प्रदीप इंधवे, करण तायडे, रुपेश गजरे, निखिल पारधे, निखिल जोगी, सोहन गजरे, आनंद बिर्हाडे, इमरान शेख, सुलतान पटेल व भीम आर्मी भारत एकता मिशन च्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
नवनीयुक्त पदाधिकारी
सागर मेघे-जळगाव जिल्हा संघटक
विजय तायडे-जळगाव जिल्हा सह-सचिव
संतोष तायडे-जळगाव जिल्हा सह-सचिव
अशोक तायडे-जळगाव जिल्हा उप-सचिव
प्रवीण तायडे यावल तालुका मुख्य संघटक
रोहित सपकाळे यावल तालुका कोषाध्यक्ष
सचिन पारधे यावल तालुका उपाध्यक्ष
बबलू गजरे यावल शहराध्यक्ष
हर्षल गजरे यावल शहर उपाध्यक्ष
जितेंद्र गायकवाड यावल शहर मुख्य संघटक
गौतम पारधे यावल शहर कोषाध्यक्ष