मरीमाता मंदिरांच्या बारागाड्यांना ओढतांना तरुणांच्या अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, सहा जण जखमी
भुसावळ (ओमशंकर रायकवार) शहरातील मरीमाता मंदिराच्या गुढी पाडवा निमित्त यावर्षी बारागाड्यांना ओढण्यात आले. त्यामध्ये एक तरुणांच्या अंगावरून चार गाड्या गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जखमी झाल्याने मरीमाता मंदिरांच्या बारागाड्यांना लागले गालबोट लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चैत्र शु.१ मासारंभ गुढी पाडवा निमित्त जुने सातारा मधील मरीमाता मंदिराच्या बारा गाड्या गुरुद्वारा पासून ते मारीमाता मंदिरा कडे जात असतांना बाबुराव चक्की जवळील स्पीड ब्रेकर वरून बारागाड्या रस्त्याच्या एका साईडला गेल्याने बारागाड्या सोबत पळत असणारा गिरीश उर्फ गबू कोल्हे ह्या तरुणास रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या नागरीकांनी आपला जीव वाचविण्यासाठी बारागाड्यांवर लोटल्याने त्या तरुणांच्या अंगावरून चार बारागाड्या गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे तर यामध्ये नितीन फेगडे, छोटू इंगळे, मुकेश यशवंत पाटील, दिपक कोळी, धर्मराज कोळी हे जखमी झाले असून साईपुष्प हॉस्पिटल व गिरीजा हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.