वरुड येथे युवासेनेतर्फे थाळी बजाओ आंदोलन
वरुड (रुपेश वानखडे) वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याकरिता थाळी बजाओ आंदोलन वरुड येथील महात्मा फुले चौक येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरून सरदेसाई, यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्यातील युवासेना विस्तारक राज दीक्षित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश भाऊ वानखडे, यांच्या मार्गदर्शनात युवा सेना जिल्हाप्रमुख धिरज खोडस्कर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विजय निकम, माजी नगराध्यक्षा हेमलता कुबडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख त्रिवेणी झोड, युवासेना उपजिल्हाप्रमुख भूपेंद्र कुवारे, युवासेना विधानसभा संघटक धीरज वाघमारे, शिवसेना उपशहरप्रमुख राजू मानकर, सुभाष काळबांडे, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल पाटील, युवा सेना युवा सेना तालुका समन्वयक शुभम चौधरी, शहर प्रमुख शशी खेरडे, युवा सेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख भूषण ददघाये पवन खोडस्कर, प्रज्वल चौधरी, सुशांत चिंचमलापुरे, पंकज खोडस्कर, नयन मालपे, चेतन सुरजुसे, सागर डोके, पवन विलातकर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



