शिंदखेडा येथील नगरसेवक विजयसिंह राजपुतांच्या दोन गाड्यांमधील पैसे चोरीप्रकरणी संशयित पवन राजपूतला अटक !
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायत नगरसेवक व समाजवादी पक्षाचे धुळे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष यांच्या घरातील कंपाऊंडला लावलेल्या दोन गाड्यांचे काचा फोडून तब्बल दिड लाख लंपास केली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर संशयित पवन कोमलसिंग राजपूत यास तपास पोलीस नाईक अनंत पवार यांनी ताब्यात घेऊन शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता त्यास शनिवार पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, रथगल्ली येथील रहिवासी विजयसिंह नथेसिंह राजपूत हे नगरपंचायत चे विद्यमान नगरसेवक व समाजवादी पक्षाचे धुळे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष आहेत. ते नेहमीप्रमाणे रात्री घरी आल्यावर जेवण झाल्यावर झोपले असतात. पहाटे दि. 20 रोजी उठल्यानंतर कंपाऊंड जवळ आल्यावर दोन्ही चारचाकी गाड्याची चौकशी करून काचा फुटलेल्या व साहित्य अस्ताव्यस्त दिसले. नंतर सदर पहिली अॅम्बेसिटर गाडीत ठेवलेले पन्नास हजार व दुसरी सेन्ट्रास गाडीतून एक लाख रुपये असे एकूण दिड लाख रुपये चोरटय़ांनी चोरून नेला आहे. ही घटना दि . 19 व 20 मार्च रोजी दरम्यान घडली आहे. घरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला गेले असता फोडलेले दिसले. परंतु मागील फुटेज तपासणी केली असता गल्लीत राहणारा पवन कोमलसिंग राजपूत हा दिसत होता. म्हणुन सदर संशयित विरोधात पोलीस स्टेशन ला दि.20 मार्च रोजी फिर्याद विजयसिंह राजपूत यांनी दाखल केली होती.सदर फिर्याद दिल्यानंतर तपास पोलीस नाईक अनंत पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाची चक्र फिरवून गुरुवार (दि.24) रात्री साडेदहा च्या सुमारास प्रट्रोलिंग करताना संशयित आरोपी पवन राजपूत यास ताब्यात घेतले. त्यानंतर शिंदखेडा न्यायालयात (25 शुक्रवार) हजर केले असता पवन राजपूत यास दि.26 मार्च शनिवार पर्यंत पोलीस कोठडी न्यायाधीश संतोष वैद्य यांनी सुनावली. या संशयित आरोपी कडुन काही धागेदोरे हाती येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जेणेकरुन इतर मोटारसायकल व लॅपटॉप चोरी चे चेहरे समोर येतात काय ते सखोल चौकशी करून उघड होऊ शकते. पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर शहरवासियाना थोडाफार दिलासा मिळाला आहे. परंतु सत्य बाहेर येणे बाकी आहे.